
पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे. भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.